IAS Puja Khedkar | IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ ! मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला लावली नोटीस (Video)
पुणे : IAS Puja Khedkar | वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन केल्याचे समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. तसेच आयएएस मध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रावरुन सध्या वाद सुरु झाला आहे. त्यातच पूजा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (IAS Puja Khedkar)
या सर्व घडामोडी थांबत नाही तोवर पुण्यातील बाणेर परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट क्रमांक 112 मध्ये मनोरमा खेडकर या रो-हाऊसमध्ये राहण्यास आहेत. मात्र, त्यांनी या बंगल्याची सिमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर तीन फूट रुंद, दोन फुट उंची आणि साठ फुट लांबीचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते येत्या सात दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने काढून घ्यावे, सात दिवससांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे महानगरापिकेच्या अतिक्रण विभागामार्फत काढून टाकले जाईल, अशा आशयाची नोटीस पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर चिटकवली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आयएएस अधिकारी पूजा खेडकर
राहलिया असून त्यांच्या बाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.
मात्र, कुटुंबीयांमार्फत कोणत्याही प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली नाही.
त्यामुळे आता थेट पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
आता यावर खेडकर काय भूमिका मांडतात हे पहावे लागेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड