Pune Police Notice To Manorama Khedkar | ‘तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये?’; पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस

Manorama Khedkar

पुणे : Pune Police Notice To Manorama Khedkar | परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Puja Khedkar) यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या निवडीबाबतच्या कागदपत्रांवरूनही आरोप केलेले असून त्याची चौकशी सुरु आहे. या सर्व घडामोडीच्या दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना असल्याने पिस्तुलाचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी व शर्ती चा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून येत्या १० दिवसात आपलं लेखी म्हणणं मांडावं, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल’, अशा आशयाचा मजकूर असलेली नोटीस मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याच्या भिंतीवर पुणे पोलिसांनी चिटकवली आहे. (Pune Police Notice To Manorama Khedkar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड