PMPML Bus | नव्या पीएमपी बस दाखल झाल्यानंतरही दीड हजार बसेसची तूट कायम राहणार; प्रवाशांचे हाल

pmpml

पुणे : PMPML Bus | पीएमपी च्या कारभारावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत पीएमपी च्या कारभाराकडे लक्ष वेधले होते. ‘एकाही व्यवस्थापकीय संचालकाला सरकार कार्यकाळ पूर्ण करू देत नाही. शहरातील सार्वजनिक प्रवासासाठी एकमेव असलेल्या या कंपनीचे कामकाज कार्यक्षम व्हावे असे सरकारला वाटतच नाही. खंबीर, कणखर व्यवस्थापकीय संचालक असेल, त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तर तो काहीतरी करेल मात्र सरकार कायमच त्या पदावरील नियुक्तीबाबत धरसोड करीत आहे’, असे पत्रात म्हंटले होते.

दरम्यान पीएमपी च्या ताफ्यात ५०० बसची वाढ होणार असे ढोल पिटले जात असताना वर्षभरात भंगारात काढलेल्या बस वजा जाता, पूर्वीचीच दोन हजार एवढीच बससंख्या ताफ्यात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे दीड हजार बसेसची तूट पुणेकरांना सहन करावी लागणार आहे.

केंद्राच्या महुआच्या गाईड गाईडलाईन १ लाख लोकसंख्येला ५० बस आवश्यक असतात. मात्र, आयटीडीपीच्या अहवालानुसार पुणे शहराची लोकसंख्या ४८.७५ लाख आहे. पिंपरी-चिंचवडची ३४.६० लाख, पीएमआरडीएची १५.३१ लाख, अशी एकूण ९८.६६ लाख लोकसंख्या आहे. यानुसार पीएमपीच्या ताफ्यात किमान ४ हजार ९०० बस असणे आवश्यक आहे. परंतु, पीएमपीच्या ताफ्यात त्या तुलनेने खूपच कमी बस आहेत. त्यामुळे पुणेकर, पिंपरी- चिंचवडकर आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत.’

पीएमपीच्या ताफ्यात १२ वर्षांपुढील १५२ बस आहेत. ११ ते १२ वर्षांदरम्यानच्या १७३ बस आहेत.
तसेच, ६ ते ९ वर्षे कालावधीतील १९३ बस आहेत आणि ५ वर्षांच्या आतील ४८८ बस आहेत.
यावरून जवळपास ३२५ बस आगामी काळात ताफ्यातून भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त नव्या बस ताफ्यात दाखल कराव्यात,
अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पीएमपी च्या ताफ्यातील बससंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
परिणामी पुणेकर प्रवाशांचे प्रवासासाठी हाल होत आहेत.
बससाठी थांब्यावर तासनतास बसची वाट पाहात थांबावे लागत आहे.
तसेच बस मिळाली तर गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड