Vadgaon Sheri Assembly | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?
पुणे : Vadgaon Sheri Assembly | लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार काही आमदार सोबत घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्यानंतर राज्यात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला (Sharad Pawar NCP) मोठे यश मिळाले. १० पैकी ८ खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु झालेली आहे.
अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad NCP) अजित पवारांसोबत गेलेले अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे. तर अनेक जण प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार हे चित्र पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यात पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांची आग्रही मागणी आहे. तर, सध्या या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पक्षाकडून उमेदवार शोधले जात आहेत.
वडगावशेरी पाठोपाठ कोथरूड विधानसभा मतदारसंघातही (Kothrud Assembly) शरद पवार यांच्या पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक जागा वाटपात कोथरूडची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे (Shivsena UBT) असेल, अशी चर्चा आहे. मात्र, येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाचपणी सुरू असून भाजपला शह देण्यासाठी नाराजांचा शोध घेतला जात आहे.
हडपसरमध्ये (Hadapsar Assembly) शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षालाही हीच जागा हवी आहे. त्यासाठी महादेव बाबर (Mahadev Babar) इच्छूक आहेत. वडगावशेरीत सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नाराजांना बळ देण्याची खेळी सुरू आहे.
या मतदारसंघातून माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik),
माजी आमदार बापुसाहेब पठारे (Bapusaheb Pathare),
भाजपचे माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे (Anil Alias Boby Tingre),
शिवसेनेचे संजय भोसले (Sanjay Bhosale Shivsena) इच्छूक आहेत.
मात्र, भाजपमध्ये जास्त इच्छूक असले
तरी ही जागा अजित पवारांकडे असल्याने भाजपमधील नाराज इच्छुकांना बळ देण्याची खेळी शरद पवार गटाकडून सुरू आहे.
त्यासाठीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंकडे (Supriya Sule) देण्यात आली आहे.
या नाराजांशी स्वतः सुळे या चर्चा करत असल्याची माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड