Pune Rains | मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घर, गाड्यांचे नुकसान, वाहतूक विस्कळीत
चिंचवड : Pimpri Chinchwad Rains | मागील चोवीस तासांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात आठ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. यात चिंचवड, आकुर्डी, नवी सांगवी, नेहरूनगर परिसराचा समावेश आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे हटवण्यात आली आहेत. (Pune Rains)
शहरात शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरातील विविध भागांमध्ये रात्री पाऊस कोसळत होता. रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत काही काळ पावसाने उसंत दिली होती. दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात काही ठिकाणी चार चाकी वाहनांवर तर काही ठिकाणी घरांवर, तर काही ठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर झाडे पडली होती.
चिंचवड, दळवी नगर परिसरामध्ये सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झाड कोसळल्याची माहिती नागरिकांनी दिली. आकुर्डी येथील शितलादेवी मंदिराजवळील खंडोबा माळ येथे सकाळी ९:०० वाजता एक झाड पडले. चिंचवड एमआयडीसी केएसबी चौक येथे सकाळी ९:१५ वाजता एक झाड पडले. चिंचवड विजय नगर झोपडपट्टी येथे पावणे बाराच्या सुमारास झाड पडले.
नेहरूनगर येथील मारुती मंदिरजवळ दुपारी १२ वाजता झाड पडले. रघु माऊली गार्डन येथे दुपारी १२:१५ वाजता झाड पडले. जुनी सांगवी येथील नॅशनल गार्डन येथे दुपारी १:०० वाजता, फुगेवाडीतील आनंद वसाहत येथे दुपारी दीड वाजता झाड पडले. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाऊन रस्त्यावरील झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. (Pune Rains)
महापालिकेच्या चिखली प्राधिकरण आणि पिंपरी मुख्यालय
या अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले.
अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रतीक कांबळे, शहाजी चंदनशिवे, मिलिंद पाटील, संदीप गायकवाड,
सुरेश घोडे या कर्मचाऱ्यांनी रस्त्यात पडलेली झाडे हटवण्यासाठी प्रयत्न केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड