Pune Crime News | पुणे: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आंबेगाव परिसरातील घटना

Molestation-rape

पुणे : Ambegaon Pune Crime News | नात्यातील तरुणाने लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केली. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे (Rape Case Pune). हा प्रकार जानेवारी 2020 ते मार्च 2024 या कालावधीत आरोपीच्या आंबेगाव येथील राहत्या घरी व तसेच पुण्यातील लॉजवर घडला आहे.

याप्रकरणी मयुर जनार्दन आवारे Mayur Janardhan Aware (वय-30 रा. इंदापुर, जि. पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांचा नातेवाईक आहे. त्याने फिर्यादी यांच्यासोबत जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवले. महिलेला घरी बोलावून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महिलेला मारहाण करुन कपडे फाडले

येरवडा : जावयाला मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडून विनयभंग (Molestation Case)केल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी हेमंत अनंता वाघमारे Hemant Ananta Waghmare (वय-52) व त्याची पत्नी (वय-50) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी 45 वर्षीय फिर्यादी महिलेच्या मुलाला आणि मुलीला मारहाण करुन जखमी करत अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस (Yerawada Police Station) करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed