Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषदेतील क्रॉस वोटिंग अंगलट येणार; 7 आमदारांचे 6 वर्षांसाठी निलंबन होणार?
मुंबई : Vidhan Parishad Election Maharashtra | महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सात काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी (Congress MLA) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांना मत दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले आहे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार असल्याने मविआची मुख्य मदार त्यांच्यावर होती. मात्र काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाचा व्हीप डावलून कॉस वोटिंग केले. ज्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला.
काँग्रेसमधील या गटबाजीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यानंतर काँग्रेस पक्षानेही या आमदारांविरोधात कठोर कारवाई उचलण्याची तयारी केली आहे. आज दिल्लीमध्ये या संदर्भात महत्वाची बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये बैठक होणार असून ७ आमदारांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. (Vidhan Parishad Election Maharashtra)
याबाबत नाना पटोले (Nana Patole) यांनी सूचक विधान केले होते.
आम्ही या गद्दार आमदारांविरोधात ट्रॅप लावला होता. त्यांची नावे समजली आहेत असे त्यांनी म्हंटले होते.
यामध्ये विदर्भातील १, मराठवाड्यातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २ व मुंबईतील एक आमदार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्टीं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार