Shivsena UBT On Mahavikas Aghadi | ठाकरेंकडून मविआ सोडण्याचा इशारा; पवारांच्या फोनलाही उत्तर नाही; विधानपरिषद निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray-Aaditya Thackeray-Sanjay Raut

मुंबई : Shivsena UBT On Mahavikas Aghadi | विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान (Vidhan Parishad Election Maharashtra) मविआ मध्ये पडद्याच्या पाठीमागे अनेक घडामोडी घडल्या. थेट उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मविआमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तसेच काँग्रेसमधील क्रॉस वोटिंग चा मुद्दा सोडता मतदान करण्यावरून दोन गट पडले होते अशी माहितीही आता समोर येत आहे.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), उमेदवार जयंत पाटील, ठाकरेसेनेचे नेते अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शेकापच्या जयंत पाटील यांचे पुतणे निनाद पाटील देखील उपस्थित होते. काका जयंत पाटील यांच्याविरोधात ठाकरे सेना कट रचत असल्याचा आरोप निनाद पाटील यांनी केला. त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीत संघर्ष पेटला याबाबतचे वृत्त माध्यमांमधून पुढे आले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडू, अशी धमकी ठाकरेंकडून देण्यात आली. विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले. पण ठाकरेंनी त्यांच्या फोनला उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे.

राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी आणि कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंना आवश्यक ७ मतांचा पाठिंबा देण्याची तयारी होती, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांनी पाठिंबा दिलेले उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते. ज्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता.

ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीच्या २२ मतांनी विजय मिळवला होता,
ज्यात काँग्रेसची ७ आणि ठाकरेंच्या शिवसेनेची १५ आणि एक अपक्ष आमदार होता.
खरं तर काँग्रेसची ही ७ मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता.
कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता.
यामध्ये मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता.
या आमदारांची मतं फुटण्याची ठाकरेंना भीती होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त मतं मिळाली आहेत.
अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराला धोका असताना त्यांचा उमेदवार पहिल्या फेरीत जिंकून आला.
दोन्ही उमेदवारांनी मिळून अधिकची ५ मतं घेतली. ही मतं काँग्रेस आमदारांची असल्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनीच पक्षाचे ३-४ आमदार क्रॉस व्होटिंग करतील अशी शक्यता बोलून दाखवली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार