Deepa Mudhol Munde | दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वीकारला PMPMLचा पदभार
पुणे : Deepa Mudhol Munde | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी शनिवारी (दि.13) महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
सोमवारी (दि. 15) स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. (Deepa Mudhol Munde)
दीपा मुधोळ-मुंडे या बीडच्या जिल्हाधीकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारने आशिष येरलेकर यांची 1 जुलै रोजी या पदावर नियुक्ती केली होती. मात्र ते या पदावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची नियुक्ती रद्द करुन दीपा धुमाळ-मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा करण्यापूर्वी मुंडे यांची पूर्वीच्या आदेशानुसार सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यास सांगितले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार