IAS Puja Khedkar | ओबीसी कोट्यातून पूजा खेडकरचे MBBS; वडील आयएएस असतानाही नॉन क्रिमिलेअर कोट्यातून प्रवेश
पुणे : IAS Puja Khedkar | परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांची आयएएसपदी नियुक्ती झाली. पुण्यात त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही त्यांनी गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे; परंतु खेडकर यांच्याबाबत रोजच नवनवे खुलासे समोर येत आहेत.
पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून (Kashibai Navale Medical College) एमबीबीएसची पदवी घेतलेली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी एमबीबीएसला ओबीसीतील भटक्या जमाती-३ (एनटीसी-३) या कोट्यातून प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे, वडील आयएएस अधिकारी असताना त्यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate) जोडले होते. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत होते त्यांनाच मिळत होते.
खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्या कोट्यातून त्यांना नोकरीही मिळाली,, परंतु वैद्यकीय प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच त्यांना अपंगत्व आले होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावेळी खेडकर यांना सीईटीमध्ये २०० पैकी १४६ गुण मिळाले. त्याआधी दहावीला ८३ टक्के व बारावीला ७४ टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान एमबीबीएसचा साडेपाच वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे येथील अधिकारी सांगतात. (IAS Puja Khedkar)
“पूजा खेडकर यांनी सन २००७ मध्ये आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला होता
आणि ती डिग्री पूर्ण केलेली आहे. त्यावेळी सीईटीद्वारे प्रवेश देण्यात आला होता.
त्यावेळी त्यांना एनटीसी-३ या प्रवर्गातून प्रवेश दिला आहे,
तसेच त्यावेळचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे.
सोबत जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देखील जोडलेले आहे, अशी माहिती
डॉ. अरविंद भोरे, वैद्यकीय संचालक, काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय नऱ्हे, यांनी दिलेली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार