BJP Samvad Yatra | भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा ! 21 तारखेला पुण्यात 5000 पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

Amit Shah-Nitin Gadkari

मविआचे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद होणार

पुणे : BJP Samvad Yatra | विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. येत्या २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की ठरणार आहे.

ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शाह (Amit Shah), नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • संवाद यात्रा

महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे.

  • संघटनात्मक बैठक

21 जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी 19 तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले. (BJP Samvad Yatra)

  • विरोधकांची भूमिका निंदनीय

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही.
मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती.
विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही.
विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले.
चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील.
महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed