IAS Puja Khedkar | पूजा खेडकरवर आरोप ! …तर मी राजीनामा द्यायला सांगतो; वडील थेटच बोलले
पुणे : IAS Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar RTI) यांनी पूजाने अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याचा आरोप केला.
या संपूर्ण आरोपावर बोलताना पूजाचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) म्हणाले की, पूजाने नियमांनूसारच काम केलं असून काहीही चुकीचं वागलेली नाही. वरिष्ठांसोबत बोलणं करुनच तिने खाजगी वाहनावर लाल दिवा लावला होता. तिने सादर केलेली सर्व प्रमाणपत्र खरे असल्याचं दिलीप खेडकर यांनी स्पष्ट केले आहे. (IAS Puja Khedkar)
ते पुढे म्हणाले, एक महिला, तरुण मुलगी असेल तर तिने सर्वसामान्यांच्या वॉशरुममध्ये जाणं बरोबर आहे का? तिला काही अडचणी असतात. प्रशिक्षणार्थीला केबिन देऊ नये, असं कुठं लिहून ठेवलं असेल तर पूजाला राजीनामा द्यायला लावतो, तिला स्वत: अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केबिनबाबत सांगितलं आहे. तिने केबिनसाठी दबाव आणला नसल्याचं दिलीप खेडकर म्हणाले आहेत.
राज्यातील आयएएस अधिकारी पाहता त्यांना कार्यालयीन वापरासाठी गाड्या दिलेल्या असतात. पूजा ही प्रशिक्षणार्थी असली तरी शासकीय विभागात जाऊन तिला प्रशिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे रुजू झाल्यानंतर तिने कुठे बसू विचारलं तेव्हा गाडी आणि कार्यालय मिळणार नसल्याचं तिला सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिला मतदान केंद्रावर ड्यूटीसाठी पोहोचायचे होते. ती नातेवाईकांची गाडी घेऊन मतदान केंद्रावर पोहोचली. तिथे तिला दोन किमी अंतरावरून डावलण्यात आले.
अधिकारी असल्याचे सांगूनही त्यांनी ऐकलं नव्हतं. तसेच तुमच्या गाडीवर तसे काही नाहीये,
त्यामुळे तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही असे सांगितले . गाडी पार्क करून तिने वरिष्ठांना फोन केला मात्र सोय झाली नाही.
त्यामुळे तिने जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालून गाडीचं झालं तर बरं होईल अशी विनवणी केली.
तेव्हा तुम्ही भाड्यानं गाडी घ्या असं सांगण्यात आलं.
त्यावर लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन लावायला सांगितलं असल्याचेही खेडकर यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार