Balasaheb Thorat On Bhaskar Jadhav | विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस व्होटिंग केले? भास्कर जाधवांच्या आरोपावर बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले…

मुंबई : Balasaheb Thorat On Bhaskar Jadhav | नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Maharashtra) सात काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीचे (Mahayuti) नऊही उमेदवार निवडून आले.
काँग्रेसच्या ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले आहे त्यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरु आहेत. क्रॉस व्होटिंग (Cross Voting In Vidhan Parishad) केलेल्या आमदारांमध्ये विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचाही सहभाग असल्याचा आरोप ठाकरे गटाचे (Shivsena UBT) आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. जाधव यांचे वक्तव्य फेटाळत त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.
“काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्या आमदारांमध्ये मी विश्वजीत कदम यांचे नाव पाहिल्यासारखं वाटतंय” असे भाष्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले होते. (Balasaheb Thorat On Bhaskar Jadhav)
हे वक्त्यव्य फेटाळत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले की, “विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, हे आम्हाला मान्य आहे.
सदर आमदारांच्या नावाची निष्पत्ती झाली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.
मात्र यामध्ये विश्वजीत कदम यांचं नाव घेणं योग्य नाही. भास्कर जाधव असं का बोलले, हे मला समजलं नाही.
जाधव यांचा हा विषय नाही,” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदमांची पाठराखण केली आहे.
दरम्यान लोकसभेला सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून मविआत संघर्ष पाहायला मिळाला होता.
मविआत ही जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजीत कदम यांनी अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil)
यांना ताकद देत निवडून आणले होते. त्यावर जाधव यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक