IAS Puja Khedkar | आयकर विभागाकडुन होणार खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची पडताळणी; पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात

Puja Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये (Washim) बदली करण्यात आली आहे. दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer Certificate) दाखल्याची अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांकडून (Ahmednagar Collector) सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच हा चौकशी अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर आता आयकर विभाग (Income Tax Department) खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहे. खेडकर यांच्या आयटीआर वरून ही पडताळणी केली जाणार आहे.

पूजानंतर तिचे आई-वडील अडचणीत आले. त्यांच्यावर स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहेत. दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही मिळून आले नाहीत. त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आले आहे.

यासंदर्भांत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh) यांनी सांगितले की, “दोघेही आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांचे फोन बंद आहेत. पोलीस त्यांच्या घरीही गेले होते, पण ते तिथे हजर नव्हते. स्थानिक गुन्हे शाखा (Pune LCB) आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पथके पुणे आणि परिसरात त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान होत असलेल्या आरोपांवर पूजा खेडकर यांनी माध्यमांसमोर येत भाष्य केले.
समिती मला जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरं मी त्यांना देईन. समितीचा निर्णय मला मान्य असेल,
असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निदोर्ष असतो असं आपलं संविधान सांगतं.
मीडिया ट्रायलमध्ये मला गुन्हेगार दाखवलं जात आहे, हे चुकीचं आहे’, असं म्हणत पूजा खेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. (IAS Puja Khedkar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed