NCP Party-Symbol Hearing | राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणीत मोठी अपडेट! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Sharad Pawar - Ajit Pawar - Supreme Court

मुंबई : NCP Party-Symbol Hearing | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरु झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट (Sharad Pawar NCP) विरुद्ध अजित पवार गट (Ajit Pawar NCP) असे दोन गट निर्माण झाले. त्यात निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. याप्रकरणी शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात अजित पवार गटाने दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असल्यास एक आठवड्यात शरद पवारांनी ते दाखल करावे, असेही कोर्टाने म्हंटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. (NCP Party-Symbol Hearing)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed