Parvati Assembly Constituency | पर्वती विधानसभेबाबत आबा बागुल यांनी घेतली शरद पवार यांची भेट; पवार म्हणाले – ‘निवडून येणार असेल तर…’

Aba bagul-Sharad pawar

पुणे : Parvati Assembly Constituency | सर्वपक्षीयांकडूनच आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. उमेदवार म्हणून इच्छुक असल्याबाबत त्या- त्या मतदारसंघातील नेते पक्ष श्रेष्ठींना सांगत आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच लोकसभेच्या वेळी नाराज असलेले काँग्रेसचे आबा बागुल (Aba Bagul) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची मोदी बागेत आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवारांना पर्वती विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. या मतदारसंघात भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले (Shrinath Bhimale) यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपचेच माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar) हेही या मतदारसंघातून उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनाही आपली आमदारकी कायम ठेवायची आहे. सरकारच्या योजनांचा प्रचार, मतदार नोंदणी अशा उपक्रमांमधून या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. इच्छुकांच्या संख्येमुळे मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांनुसारच गट तयार झाले आहेत, मात्र यातून पर्वती मतदारसंघात निवडणूकीआधीच निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागुल विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस व शरद पवार गट यांच्यात या मतदारसंघावरून चढाओढ सुरू आहे. माजी उपमहापौर आबा बागूल काँग्रेसचे आहेत. त्यांना इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे, मात्र मतदारसंघच पक्षाकडे नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.

सलग ६ वेळा ते नगरसेवक होते. आता आमदार व्हायचेच या इराद्याने ते कामाला लागले आहेत. काहीही करा, पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करण्याचे, पक्षाच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करण्याचे उपायही अवलंबून पाहिलेत. आता ते डिनर डिप्लोमसीचा वापर करत असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांची बागुल यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आता एक एक उमेदवारी महत्वाची आहे.
मी साहेबांना विनंती केली की, पर्वती विधानसभा ही काँग्रेसला सोडा. साहेब म्हणाले, निवडून येणार असेल तर आम्ही विचार करू.
काँग्रेसने सगळ्यांना आमच्याकडे संधी दिली आहे. मला अजून संधी दिलीच नाही ती त्यांनी द्यावी.
मी निवडून येऊ शकतो. गेली ३०-४० वर्ष मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अनेक जण इच्छुक आहेत तर तुम्हाला संधी मिळेल का?
असे बागुल यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटी पक्षश्रेष्टी ठरवतील ते होणार, पक्षश्रेष्ठीचा आदेश महत्वाचा असतो.
मी निवडणुकीवर ठाम असून काही होत नाही. मी फक्त विनंती करणार आहे.
पण मला उमेदवारी मिळाली तर १०० टक्के आमदार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed