Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवड शहरात इंग्रजी माध्यमाच्या 11 शाळा अनधिकृत, दोन शाळांवर गुन्हा दाखल

Orchids International School

पिंपरी : Pimpri Chinchwad | शहरातील 11 अनधिकृत शाळांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवड येथील चिंचवडेनगर मधील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल (Little Star English Medium School ) आणि चिंचवड येथील लिंक रोडवरील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (Orchids International School) या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या गुन्ह्यात लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे श्रेयशकुमार (रा.चिंचवडेनगर) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2),336(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरा गुन्हा ऑर्चिड इंन्टरनॅशनल स्कुलचे जे डीकोस्टा (रा. बेंगलोर), समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 336(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यामध्ये विलास दयाराम पाटील (वय-51 रा. कृष्णा चौक, नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 पासून संशयितांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pimpri Chinchwad)

महापालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा

पिंपरी चिंचवड शहरातील 11 इंग्लिश मिडीयमच्या शाळा अनिधिकृत असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभाग प्राथमिक, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी 27 जून 2024 रोजी पत्रकाद्वारे माहिती दिली.

  1. पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, गांधीनगर पिंपळे निलख
  2. चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूल, विशालनगर, पिंपळे निलख
  3. आयडीएल इंग्लिश स्कुल, जवळकरनगर, पिंपळे गुरव
  4. सपलिंग्स इंग्लिश मिडीयम स्कुल, मोशी
  5. लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल, चिंचवडेनगर
  6. नवजित विद्यालय, लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी
  7. किड्सजी स्कूल, पिंपळे सौदागर
  8. एम.एस. स्कुल फॉर किड्स, सांगवी
  9. क्रिस्टल मॉर्डन स्कुल, वडमुखवाडी, चऱ्होली
  10. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल, कासारवाडी
  11. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed