OBC Reservation Rally | 26 जुलैपासून ‘आरक्षण बचाव’ यात्रा काढणार; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Prakash Ambedkar

छ. संभाजीनगर : OBC Reservation Rally | मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे (Maratha Reservation). आरक्षणाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी २६ जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा (Aarakshan
Bachao Yatra) काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” आम्ही २६ जुलै पासून ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात करणार आहोत. त्याचा कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास असेल. अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली की, ओबीसींचा लढा हातात घ्या. आताची परिस्थिती भयानक होत आहे. नामांतराची आठवण येईल असे सुरु आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना भीती आहे.

तर दुसरीकडे ‘मनोज जरांगे पाटील यांचे गरीब मराठ्यांसाठी आंदोलन सुरु आहे. सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत. सगेसोयरे हे भेसळ आहे. आताच्या मिळालेल्या नोंदीवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. ती रद्द करावीत. असेही त्यांनी सांगितले.

मागेच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपी, काँग्रेस
आणि ठाकरे गटाचे कुणीच उपस्थित नव्हते.
ठाकरे गट, काँग्रेस आणि एनसीपी जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत तोडगा निघणार नाही.
सामाजिक संघटना घेऊन दादर चैत्यभूमीवरून सुरुवात करायची.
२६ जुलैपासून शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती.
त्यामुळे शाहू महाराजांना नतमस्तक होऊन यात्रा काढण्याचे ठरवले आहे.
या यात्रेची सांगता ७ किंवा ८ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे, असे आंबेडकरांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed