IAS Puja Khedkar | पूजा खेडकरवर मोठी कारवाई ! प्रशिक्षण थांबवलं, डीओपीटीचे आदेश

IAS Puja Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांच्या नवनव्या कारनाम्यांनी चर्चेत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता पूजा खेडकरवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने ११ जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी डीओपीटीने पूजाचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आल्याचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकरचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. अशाप्रकारची देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याची माहिती आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने याबाबत आदेश काढले आहेत.

पूजा खेडकरला २३ जुलैपूर्वी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करावे लागणार आहे. राज्य सरकारने ११ जुलै रोजी दाखल केलेल्या सविस्तर अहवालानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या कारनाम्यामुळे तिची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली होती. आधी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचं प्रकरण, नंतर वरिष्ठांची केबिन बळकावली, खासगी गाडीला लाल दिवा लावला त्यानंतर त्यांची बदली झाली.

त्यानंतर मात्र पूजा खेडकरने कोट्यवधींची संपत्ती असताना बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढे आले आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
एवढंच नाहीतर दिव्यांगाचं बनावट प्रमाणपही पूजाने मिळवल्याचे प्रकरण पुढे आले.
या सगळ्या प्रकरणाची यथोचित चौकशी करावी, अशी विरोधी पक्षाने मागणी केली. (IAS Puja Khedkar)

नोडल एजन्सी डीओपीटीने पूजाचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणत कारवाई केली आहे.
तसेच संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीदेखील गठीत करण्यात आली असून
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed