Pune Police MCOCA Action | तळेगाव दाभाडे येथील मुऱ्हे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्तांची 22 वी कारवाई
पिंपरी : Pimpri Chinchwad Police MCOCA Action | तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) हद्दीतील योगराज मुऱ्हे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई करण्यात आली आहे. दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 22 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 135 गुन्हेगारांवर ‘मोक्का’ कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police MCOCA Action)
टोळी प्रमुख योगराज उर्फ बिट्या विश्वनाथ मुऱ्हे (वय-36 रा. डेफोडील्स सोसायटी, सोमाटणे फाटा), प्रेम सुरेश सोनवणे (वय-21 रा. कोथुर्णे पवनानर), अमित मच्छींद्र शेटे (वय-35 रा. बालाजीनगर, चाकण), लहु अशोक भालेकर (वय-32 रा. विठ्ठलवाडी, सोमाटणे), सुरज उर्फ बंट्या दत्तु गायकवाड (वय-21 रा. हरपळे आळी, खंडोबा माळ, फुरसुंगी, हडपसर) यांच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आयपीसी 398, 387, 504, 506(2), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीवर 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत पसरवण्यासाठी तळेगाव दाभाडे, पिंपरी, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणीसाठी अपहरण, खंडणी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. (Pune Police MCOCA Action)
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 बापु बांगर,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावार,
पीसीबी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे पोलीस अंमलदार तारु, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक