Pune Crime News | पिंपरी: बनावट कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, केअर टेकरला अटक

FAKE

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कागदपत्र (Fake Documents) तयार करुन 10 गुंठे जागा बळकावल्या प्रकरणी केअर टेकरला वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) अटक केली आहे. हा प्रकार रहाटणी येथील गट क्रमांक 17/3 अ व गट क्रमांक 17/3 ब येथे 24 डिसेंबर 2021 ते 11 मार्च 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत आनंद श्रीनिवास हिरेकातुर (वय-53 रा. अभिमान श्री सोसायटी, पाषाण रोड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश शंकर जुनावणे Suresh Shankar Junavane (वय-52 रा. शिल्परेखा बिल्डिंग, डीपी रोड, औंध, पुणे) याच्यावर आयपीसी 447, 406, 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीला त्यांच्या वडिलांनी रहाटणी येथील गट क्रमांक 17/3 अ व गट क्रमांक 17/3ब येथे दहा गुंठे जागा दिली होती.
यासाठी आरोपी सुरेश जुनावणे याला केअर टेकर म्हणून नेमले होते.
मात्र, त्याने त्याच्या अधिकाराचा गैरफायदा करत त्या जागेचे खोटी कागदपत्र तयार करुन घेतली.
त्याने खोट्या सह्या करुन फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावावर असलेली दहा गुंठे जागा स्वत:च्या नावावर असल्याचे दाखवले.
तसेच जागेचा अनधिकृतरित्या ताबा घेऊन त्यावर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावून फसवणूक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed