Pune Crime News | पिंपरी: कामावरुन काढल्याच्या रागातून सिक्युरिटी सुपरवाझरला मारहाण

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीच्या सिक्युरिटी सुपरवायझर व एच आर यांना शिवीगाळ केल्याने कामावरुन कमी केल्याच्या रागातून सिक्युरिटी सुपरवायझरला रस्त्यात अडवून चार जणांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.15) रात्री आठच्या सुमारास भांबोली येथील होरीबा कंपनी समोरील रोडवर घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सिक्युरीटी सुपरवायझर शिवप्रसाद राजेश्वर त्रपाठी (वय-36 रा. वासुली फाटा, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ऋत्विक राठोड (रा. झित्राई मळा, चाकण) याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 118, 126(2), 352, 351(1), 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे होरीबा कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. तर आरोपी ऋत्विक राठोड हा कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होता. 8 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास त्याची कामावरुन सुट्टी झाली नसताना त्याने कंपनीच्या गेटवर जमा केलेला मोबाईल फिर्यादी यांच्याकडे मागितला. त्यावेळी फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. आरोपी ऋत्विक याने फिर्यादी व कंपनीच्या एच. आर यांना शिवीगाळ केली होती. यावरून आरोपीला कामावरून काढून टाकले होते. याचा राग त्याच्या मनात होता.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी कंपनीत कामावर जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवली.
तुझ्यामुळे माझे काम गेले, असे म्हणून ऋत्विक याने फिर्यादी यांना शिवागाळ केली.
तर त्याच्या साथीदाराने कमरेचा बेल्ट काढून फिर्यादी यांना मारहाण केली.
तर एकाने काठीने शरीरावर मारहाण करुन जखमी केले.
फिर्यादी खाली पडले असता आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच पुन्हा मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed