IAS Puja Khedkar | IAS पूजा खेडकर प्रकरण : तक्रार करणारे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
अकोला : IAS Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase) यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची लेखी तक्रार दाखल केली आहे. वाशिम पोलिसांनी ती तक्रार सध्या चौकशीत ठेवल्याची माहिती आहे. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत सोमवारी रात्री उशिरा तीन तास पूजा खेडकर यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. ती या तक्रारीसंदर्भातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्रास दिला असा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची सोमवारी तीन डीवायएसपी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर पूजा खेडकर यांनी जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात पोलीस पूर्ण चौकशी करणार आहेत. त्यानंतर डॉ. दिवसे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. (IAS Puja Khedkar)
आयएएस पूजा खेडकर यांचे अनेक वादग्रस्त प्रकार समोर आले. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावरच पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले. तब्बल 11 वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांना पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिवसे यांनी केली होती तक्रार
पूजा खेडकर यांच्याविरोधात सुहास दिवसे यांनी सर्व प्रथम तक्रार दाखल केली होती.
प्रशिक्षणार्थी असलेल्या खेडकर यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती.
मात्र, प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नसतानाही त्यांनी आपल्या खासगी ऑडी कारला लाल रंगाचा दिवा लावला होता.
या सर्व प्रकारानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक