Pune Accident News | पुणे: पालखी मार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू

Baramati Pune Accident News

बारामती/पुणे : Baramati Pune Accident News | बारामती तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लीमटेक मार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर Aditya Abasaheb Nimbalkar (वय-22 रा. सणसर इरिगेशन बंगला, ता. इंदापुर) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील रुई इथ पालखी मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात आदित्य निंबाळकर याचा मृत्यू झाला आहे. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा आदित्य हा मुलगा आहे. मंगळवारी (दि.16) सायंकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी जवळ हा अपघात झाला. (Pune Accident News)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीला जात होता. त्याच्या चार चाकी गाडीचं टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यानंतर कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. यात आदित्य गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्यच्या मृत्यूमुळे निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तसेच गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ