Pune News | पुणे : विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी महिलेचा वाटेत मृत्यू

Kamal Sopanrao Borkar

पुणे : विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जात असताना एका वारकरी महिलेवर काळाने घाला घातला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी महिला कमल सोपानराव बोरकर (वय-65 रा. पंधरा नंबर, हडपसर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) अकलुज जवळील तोंडले-बोंडले गावात घडली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

कमल बोरकर या मुळच्या नारायणपूरच्या आहेत. नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंब हडपसर भागातील पंधरा नंबर येथे राहत आहे. त्या पालखी सोहळ्यातील सत्संग दिंडी क्रमांक 22 मधून पायी वारीत सहभागी झाल्या होत्या. मागील पंधरा वर्षापासून त्या पायी वारी करत आहेत. त्या श्री गुरुदत्त भजनी मंडळाच्या अध्यक्षा होत्या.

विविध धार्मिक कार्य़क्रमात त्यांचे भजनीमंडळ भजनसेवा देत आहे. दरवर्षी पालखी विसावा येथे त्यांची भजनसेवा असते. यंदाच्यावर्षी देखील त्यांनी भजनसेवा देवून दींडीसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. एकादशीला दोन दिवस असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंब व सहकारी वारकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हडपसर परिसरातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. (Pune News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed