Pune Crime News | पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड, दोघांना अटक

Vehicle Vandalism In Pimpri

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे (Vehicle Vandalism). पिंपरी येथील अशोक थेटरच्या मागे तीन जणांच्या टोळक्याने एका व्यावसायिकाला कोयत्याने मारुन (Koyta Attack) जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले (Robbery Case). तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) सकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत मल्लीकार्जुन चंद्रशेखरय्या साली (वय-36 रा. राजश्री टॉवर्स, गोलांडे इस्टेट, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रतीक धंदर, मुबारक शेख (दोघे रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. तर अमन शेख (रा. पिंपरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(6),115(2), 352, 351, 324(4)(5), 3(5) सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सकाळी पावणे सहाच्या सुमारास जिम करुन धनराज ट्रेडर्सच्या समोर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच हाताने मारहाण करुन उलट्या कोयत्याने मारुन जखमी केले. फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट काढून त्या पाकीटातील साडे चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दहशत पसरवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेली चारचाकी गाडीची काच कोयत्याने फोडून नुकसान केले. तसेच त्याठिकाणी रोडवर पार्क केलेल्या इतर तीन गाड्यांच्या कोयत्याने काचा फोडून परिसरात दहशत पसरवून निघून गेले. साली यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पिंपरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed