IAS Puja Khedkar Controversy | या सर्व घडामोडींमागे राजकीय कारस्थान; पूजा खेडकरच्या वडिलांचा आरोप, म्हणाले…

Puja Dilip Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar Controversy | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ (Maharashtra Sarkar) असा बोर्ड गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar RTI) यांनी पूजाने अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र (Disability Certificate) सादर केले असल्याचा आरोप केला. त्यानंतर खेडकरचे नवनवे कारनामे समोर येऊ लागले.

एकीकडे हे सर्व प्रकरण चर्चेत आलेलं असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी मोठा आरोप केला आहे. हे सर्व प्रकरण म्हणजे त्यांच्या विरोधातील राजकीय कारस्थान असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “सगळी शासन यंत्रणा दुसरं कुठलं काम नसल्यासारखी या प्रकरणात कामाला लागली, असं कसं झालं?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) नियमानेच काढले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच मालमत्ता आणि उत्पन्न यात फरक फरक असतो म्हणत संपत्तीवरून झालेले आरोप त्यांनी फेटाळले आहेत.

दरम्यान, पूजा खेडकर प्रकरणामागे राजकीय कारस्थान असल्याचा थेट आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. मात्र, यामागे नेमकं कोण आहे? यासंदर्भात त्यांनी भाष्य केलेलं नाही. “माझ्यावर राजकीय वरदहस्त असता, तर या प्रकरणात इतकं मीडिया ट्रायल झालंच नसतं. मी राजकीय बळी आहे. निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे या हेतूने काही प्रश्न घेऊन मी लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझं निवडणूक लढवणं माझ्या विरोधकांना पटलेलं नसू शकतं. त्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो”, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

“विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही मी जाहीर केलं होतं.
त्यामुळे मला कसं बदनाम करता येईल याचा विचार माझ्या विरोधकांचा होता.
पण मुलांपर्यंत जाणं आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं हे दुर्दैवी आहे.
सगळी शासकीय यंत्रणाच दुसरं काही काम नसल्यासारखी माझ्या मुलीच्या बाबतीत कामाला लागल्याचं दिसतंय”,
असा थेट दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed