Sharad Pawar On Maratha-OBC Reservation Issue | आरक्षणाबाबतच्या बैठकीत अनुपस्थिती; भुजबळांची भेट; शरद पवार थेटच बोलले; म्हणाले – ‘आता राज्यकर्ते हे, निर्णय घ्यायचा अधिकार…’

sharad pawar eknath shinde

पुणे : Sharad Pawar On Maratha-OBC Reservation Issue | मागील काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे, तर या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे. याबाबत छगन भुजबळ यांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेत तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्याअगोदर राज्यसरकारकडून बोलावलेल्या आरक्षणाच्या बैठकीला मविआ नेते उपस्थित न राहिल्याने सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. या सर्व बाबींबाबत आज शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा करत राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे (Mahayuti Govt). तसेच भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” छगन भुजबळ आले. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या. या या गोष्टी केल्या पाहिजे, त्यातच महाराष्ट्राचे हीत आहे असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील वातावरण निवळायचं असेल तर तुम्ही यात पुढाकार घेतला पाहिजे असं ते म्हणाले. आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीला मी गेलो नाही. त्याची कारणं दोन होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली नव्हती. आमच्या वाचनात असं आलं की, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी जालना जिल्ह्यामध्ये गेले होते. तिथे जरांगेचं उपोषण सुरू होतं. ते उपोषण करणाऱ्यांना ते भेटले. त्यांच्यामध्ये काय सुसंवाद झाला, हे आम्हाला माहिती नाही.

तो सुसंवाद झाल्यानंतर काही दिवसांनी जरांगेंनी उपोषण सोडलं. त्यानंतर नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा सुरू होती. ती आम्हाला माहिती नव्हती. दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या एका गृहस्थांनी उपोषण केलं होतं. त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे ४-५ मंत्री हे त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं तिथे काय बोलणं झालं माहिती नाही. माध्यमांमध्येही ते आलं नाही. त्यामुळे त्यांच्यात काय सुसंवाद झाला हे आम्हाला कळलं नाही.

आता बैठकीला न जाण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलत आहेत. एक जरांगे पाटील यांच्याशी बोलत आहेत. एक ओबीसीवाल्यांशी बोलत आहेत. दोघांमधील काही लोक बाहेर येऊन मोठी मोठी विधानं करत आहेत. मात्र त्यांच्यात प्रत्यक्ष चर्चा काय झाली. प्रस्ताव काय होता. हे जनतेलाही माहिती नाही आणि आम्हालाही माहिती नाही.

त्यामुळे जोपर्यंत जरांगे पाटील यांना सरकारनं काय आश्वासनं दिली आहेत,
याचं वास्तव आपल्यासमोर येत नाही आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना काही आश्वासनं दिली आहेत,
त्याची माहिती आपल्यासमोर येत नाही, तोपर्यंत तिथे जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही, असं आम्ही ठरवलं होतं.
ही माहिती आधी दिली गेली असती तर आम्ही या बैठकीला जाण्याचा विचार करू शकलो असतो”, असे शरद पवार म्हणाले.

“विरोधकांनी आपलं मत मांडावं असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता,
आता राज्यकर्ते हे, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा, सुसंवाद यांनीच साधला आणि विरोधकांनी आधी आपली भूमिका सांगावी,
त्यावर आम्ही निर्णय घेऊ, ही भूमिका समंजसपणाची, शहाणपणाची नव्हती”,
असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला लगावला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed