Pune Crime News | पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला 9 लाखांचा गंडा
पुणे : Hadapsar Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन एका महिलेला नऊ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार 5 जुलै ते 7 जुलै या कालावधीत हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी साडेसतरा नळी (Sade Satra Nali) परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर गुन्हेगारावर (Cyber Thieves) गुन्हा दाखल केला आहे.
सायबर चोरट्याने महिलेला फोन करुन पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांना तुमच्या आधार कार्डचा वापर बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे धमकावले. त्यांच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी सायबर चोरट्याने महिलेकडून ऑनलाईन 8 लाख 98 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते (PI Umesh Gitte) करीत आहेत. (Pune Cyber Crime)
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
बालेवाडी : सोशल मीडियावर संपर्क साधून सायबर चोरट्यांनी एका 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 9 लाख 11 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार बालेवाडी येथे ज्येष्ठ नागरिकाच्या घरात ऑनलाईन घडला आहे. सायबर चोरट्याने फिर्य़ादी यांना संपर्क करुन किरण बोजोत्रा असे नाव सांगितले. हॉटेलला रिव्हीयू देण्याचे टास्क मधून जास्त कमीशन मिळेल असे सांगितले. त्यानंतर कमीशन मिळत असल्याचे भासवून 9 लाख 11 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन