Sharad Pawar On Baramati Lok Sabha | … म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या – शरद पवार

Sharad Pawar

पुणे : Sharad Pawar On Baramati Lok Sabha | पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) काही पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांशी (Chhagan Bhujbal) झालेली भेट, राज्यातील आरक्षणाचा प्रश्न, राज्यसरकारची भूमिका, महायुती सरकारच्या योजना अशा मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अजित पवारांना पक्षात पुन्हा घेणार का? याबाबतही सूचक विधान केले आहे. (Maratha-OBC Reservation Issue)

दरम्यान पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना बारामती लोकसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? यावर उत्तर देताना पवारांनी ‘अरे ती बारामती आहे’ असे बोलताच परिषदेत हशा पिकला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांची नणंद- भावजय मध्ये लढत पाहायला मिळाली. देशात या लढतीची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर दोन गट पडले. एक गट शरद पवार आणि दुसरा अजित पवार यांचा गट होता. म्हणजेच बारामतीत एका प्रकारे काका पुतण्या यांची लक्षवेधी लढत होणार असल्याचे म्हंटल जात होतं. देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला. तब्बल लाखांच्या फरकाने सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या. (Sharad Pawar On Baramati Lok Sabha)

पवार म्हणाले, बारामतीत लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. आधी मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखत होतो. पण जुनी लोकं आता नाहीत. पण मला खात्री होती की , लोकं सुप्रियाला निवडून देतील. अजित पवारांना घरात स्थान मात्र पक्षात घ्यायचे की नाही हे कार्यकर्ते ठरवतील असेही पवारांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed