Maharashtra Cabinet Expansion | “मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे अन्यथा अनेक आमदार”…; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
मुंबई : Maharashtra Cabinet Expansion | महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) नोव्हेंबर पूर्वीच होणार असल्याची चर्चा आहे. अधिवेशनाच्या नंतर विस्तार होईल असे सत्ताधारी नेते म्हणत होते मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस अशी माहिती समोर येताना दिसत नाही. मंत्री पदासाठी इच्छुक असलेले अनेकजण पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यात गुंतलेले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र आता मंत्री पदे मिळाल्यास दोन महिन्यात आगामी विधानसभा निवडणुका असल्याने माजी मंत्री म्हणण्यासाठीच ते उपयोगी पडेल अशी टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.
दरम्यान महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं विधान केलं आहे.
ते म्हणाले, ” “असं काहीही होणार नाही. आता ही बातमी हायकमांडच्या माध्यमातून आली की कोणत्या माध्यमातून आली हे माहिती नाही.
मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला पाहिजे. अन्यथा अनेक आमदार नाराज होतील.
पण मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे? मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं होणार नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन