Pune Accident News | पुणे : गतिरोधकावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर

Alephata Pune Accident News

पुणे : Alephata Pune Accident News | दिवसेंदिवस पुणे शहर आणि परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास झाला. आई आणि मुलगा दुचाकीवरुन जात असताना गतिरोधकावर गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी प्रतिककुमार सुनील कवडे (वय-27 रा. शनीमंदिराजवळ, ओझर, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक मधुकर महादेव वारे (वय-38 रा. हिरपुरी, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिककुमार कवडे व त्याची आई पुष्पा सुनील कवडे हे दोघे मायलेक मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरुन आळेफाट्याच्या दिशेने येत होते. ते डोंगरे फर्निचर समोरील गतिरोधकाजवळ आले असता प्रतीकने दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस नाईक शिंगाडे करीत आहेत. (Pune Accident News)

दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी या गतिरोधक उभारण्यात आले आहेत.
मात्र, सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतिरोधक महामार्गावर वाहन चलकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
आळेफाटा बायपासवर सर्वत्र गतिरोधक करताना लांबी, रुंदी, उतार, उंचवटा
या कोणत्याही निकषाचे पालन न करता गतिरोधकांची उभारणी करण्यात आल्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed