Shivsena Eknath Shinde On Shivsena UBT | ‘शरद पवारांनी हात काढला तर ठाकरे गटाची दयनीय अवस्था होईल’; शिंदे गटाची भविष्यवाणी
मुंबई : Shivsena Eknath Shinde On Shivsena UBT | महायुती सरकारने (Mahayuti Govt) राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana ) लागू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावासाठी काही नाही का? अशी टीका करायला सुरूवात केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल लाडक्या भावांसाठी (Ladka Bhau Yojana) योजना जाहीर करून टाकली. यावरही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विशेषतः शिवसेना उबाठाकडून जोरदार टीका केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी निशाणा साधला आहे. पंधराशे रुपयात काहीच होत नाही हे आम्हाला माहित आहे पण आम्ही किमान तेवढं देण्याची तरी दानत ठेवली आपण मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Shivsena Eknath Shinde On Shivsena UBT)
ते पुढे म्हणाले, ” आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत अनेक घडामोडी होतील.
शिवसेना उबाठा गटाला काँग्रेसचा विरोध राहील. आणि शिवसेना उबाठा व काँग्रेसमध्ये बिघाडी होईल.
शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवसेना उबाठा च्या डोक्यावरील हात काढला तर त्यांची दयनीय अवस्था होईल.
येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेसच्या (Congress) जागा वाढतील अशी
भविष्यवाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…