Pune Crime News | पिंपरी: वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करुन लुटले, नागरिक दहशतीखाली

crime-logo

पिंपरी : Wakad Pune Crime News | वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles) करुन लुटल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी कौतीक हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर कोयत्याने (Koyta Attack) वाहनांची तोडफोड करुन चालकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले होते. त्यानंतर पुन्हा वाहनांची तोडफोड करुन लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना नढेनगर, काळेवाडी (Kalewadi) येथे बुधवारी (दि.17) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वाकड परिसरात वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आले आहे.

याप्रकरणी दिलीप गुलाबराय सबनानी (वय-42 रा. नंदादिप कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अनिकेत विश्वकर्मा (वय-18) व त्याच्या इतर दोन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 309, 324(4), 352, 351(2), 3(5) सह महाराष्ट्र पोलीस काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर मोठमोठ्याने ओडरण्याचा आणि काचा फुटण्याचा आवाज आल्याने फिर्यादी घराबाहेर आले. त्यावेळी फिर्यादी यांनी रोडवर पार्क केलेल्या कारजवळ तीनजण थांबल्याचे दिसले. आरोपींनी त्यांच्या कारची ड्रायव्हर साईडची काच फोडल्याचे दिसले. याबाबत फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच एकाने हातातील लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देऊन पँटच्या खिशातून जबरदस्तीने 700 रुपये काढून घेतले.
मला ओळखतो का, मी अनिकेत विश्वकर्मा आहे, मी इथला भाई आहे, मी तुझ्या गाडीची काच फोडली,
तुला काय करायचे ते कर, असे म्हणून दिलीप सबनानी यांना शिवीगाळ केली.
तसेच तु जर पोलीसात तक्रार केली तर मारुन टाकेन अशी धमकी देऊन दुचाकीवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed