Theft In Vitthal Temple Mumbai | आधी पांडुरंगासमोर हात जोडले आणि मग मुकूट चोरला, घटना सीसीटीव्हीत कैद; व्हिडीओ व्हायरल (CCTV Video)

Theft In Vitthal Temple Mumbai

मुंबई : Theft In Vitthal Temple Mumbai | आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) राज्यातून तसेच देशभरातून अनेकजण पंढरपूर (Pandharpur) मध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. कित्येक मैल पायी चालत जाऊन वारकरी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात. मात्र, मुंबईतील एका विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने चक्क विठ्ठलाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकूट चोरून नेला. हा प्रकार मंदिराच्या गाभाऱ्यात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत काय दिसले?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 37 सेकंदाचा आहे. ज्या मंदिरात चोरी झाली, त्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत एक युवक विठ्ठल मंदिरात शिरून गाभाऱ्यात येताना दिसतो. गाभाऱ्यातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीकडे येताच तो सर्वात आधी बॅगेची चैन उघडतो. त्यानंतर दोन्ही हात जोडून दर्शन घेतो. काही सेकंद इकडे-तिकडे पाहतो. कोणी नसल्याचे पाहून तो हळूच विठ्ठलाच्या मुर्तीवरील चांदीचा मुकूट बॅगेत घालून निघून जातो. (Theft In Vitthal Temple Mumbai)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ मुंबईतील बोरीवली भागातील एका विठ्ठल मंदिरातील आहे. सीसीटीव्ही फुटेज वर 10 जुलै 2024 अशी तारीख आहे. नुकतीच 17 जुलै रोजी आषाढी एकादशी झाली. त्याच्या एक आठवडा आधी ही चोरीची घटना घडली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed