Pune Crime News | पिंपरी : मद्यपींनी चालवली प्रवाशांनी भरलेली बस, प्रवाशांच्या जिवाचा थरकाप; भोसरी परिसरातील घटना
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन मद्यपींनी पीएमपी बस थांबवून चालकाला दमदाटी करुन चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वेडी वाकडी चालवली. त्यामुळे बसची वाहनांना व नागरिकांना धडक बसली. या प्रकारामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जिवाचा थरकाप उडाला. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास भोसरी येथे घडली आहे.
याबाबत सचिन गुणाजी पारधे (वय-44 रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार संतोष जाधव (वय-40 रा. भोसरी), जितेश रमेश राठोड (वय-36 रा. महाळुंगे, चाकण) यांच्यावर भान्यासं कलम -126(2), 125, 296, 115(2), 352, 351 (2), (3), 3(5) सह महाराष्ट्र पोलीस कायदा, महाराष्ट्र प्रोव्हीशन कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारुच्या नशेत पीएमपी बसला हात दाखवला. बसमध्ये चढून दोघांनी बस चालक सुरज सुखलाल काळे (वय 24) यांना शिवीगाळ केली. आरोपी जितेश राठोड याने चालकाच्या केबिन मध्ये जाऊन आरडाओरडा करून बसचे स्टेअरिंग आरोपींनी त्यांच्या हातात घेतले.
तू शांत बस, आम्हाला शिकवतोस का, आम्ही सुद्धा बस चालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस,
असे म्हणून आरोपींनी बस वाकडीतिकडी चालवत वाहनांना व नागरिकांना धडक दिली.
फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून त्यांचे गचुंडे धरुन नखे ओरखडून जखमी केले.
तसेच बसमधील प्रवाशांना शिवीगाळ केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…