Shivsena UBT On Ladka Bhau Yojana | ‘भीक नको, नोकऱ्या द्या’; लाडका भाऊ योजनेवरून ठाकरे गटाची सरकारवर जहरी टीका

eknath shinde-uddhav thackeray

मुंबई : Shivsena UBT On Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर (Mazi Bahin Ladki Yojana) लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलंय. विरोधकांनी या योजनेवरुन सरकारला (Mahayuti Govt) चांगलंच धारेवर धरलं असून जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी या योजनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. “लाडका भाऊ योजना म्हणजे तरुणांची फसवणूक” असल्याचे विरोधक म्हणत आहेत.

लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका करताना राज्यातील भावांनी काय गुन्हा केला आहे ? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे लाडका भाऊ योजनाही अंमलात आणली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाहीर केलं होतं.

यावर आता उठाबा गटाकडून शिंदे सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून स्टायपेंडची भीक नको, तर हक्काच्या नोकऱ्या द्या, अशी मागणी करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

देशात बेरोजगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे, यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत आहेत. नुकताच कर्नाटक सरकारने स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने सर्व खाजगी उद्योगांमध्ये ५० ते ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे विधेयक मंजूर केले. कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हंटले आहे.

बाळासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी रुजलेला विचार बाजूच्या कर्नाटकात बहरला.
कर्नाटक सरकारने स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती होईल का?
नोकऱ्यांसाठी महाराष्ट्र पेटून उठेल असे वातावरण झाले आहे. सध्या महाराष्ट्राची लूटमार सुरु आहे.
राज्यातील सर्व मोठे उद्योग आणि नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत,
असा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed