Pune Crime News | पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सपासप वार, आरोपी पती गजाआड

Pune Crime-marhan

पुणे : Katraj Pune Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts On Wife’s Character) घेऊन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन (Stabbing Case) गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.18) सकाळी आठच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवर (Katraj Kondhwa Road) घडली आहे.

याबाबत अनिता सुरेश शिंदे (वय-41 रा. ओमकार सोसायटी, कात्रज-कोंढवा रोड कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सुरेश रामराव शिंदे (वय-45) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश शिंदे हा बिगारी काम करतो. तो पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने त्यांच्या वाद होत होते. गुरुवारी सकाळी त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यानंतर चाकूने पत्नीच्या शरीरावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पीएसआय कोळी करीत आहेत.

जुन्या वादातून मारहाण

पुणे : तीन वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाच्या डोक्यात फायटर ने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth Pune) शाहीर अमर शेख चौकातील (Shahir Amar Shaikh Chowk) चहाच्या टपरीसमोर घडला. याप्रकरणी गणेश मधुकर लोखंडे (वय – 23 रा. मंगळवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फैजान शेख (वय-24 रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ) याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फैजान शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर समर्थ, फरासखाना, सिंहगड रोड, बिबवेवाडी, लष्कर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed