Municipal Schools In Pune | पटसंख्येअभावी पालिकेच्या 10 शाळांचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव
पुणे : Municipal Schools In Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) मराठी माध्यमांच्या (Marath Medium) पाच शाळा, इंग्रजी माध्यमांच्या दोन शाळा, तीन उर्दू माध्यम शाळा अशा एकूण १० शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे या दहा शाळांचे त्याच इमारतीत किंवा नजीकच्या इमारतीत विलीनीकरणाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.
१० शाळांचे विलीनीकरण केल्यास एकूण ८ बालवाडी शिक्षिका , ८ बालवाडी सेविका, ८ शिपाई, १ रखवालदार यांचे अन्य शाळांवर बदलीने समायोजन करता येणार आहे. तसेच अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली करून समायोजन केले जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक विभागाकडील शाळा एकाच इमारतीत पण सकाळी आणि दुपारच्या सत्रात भरत आहेत. त्यामुळे या शाळामधील पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनामध्ये अडचणी येत आहेत. पटसंख्या कमी झाल्याने राज्यसरकारने मान्य केलेल्या संच मान्यतेमध्ये १ ते ८ वीच्या आठ तुकडयांना स्वतंत्रपणे आठ शिक्षक मान्य होत नाहीत.त्या ठिकाणी शिक्षकांना जोड वर्ग घ्यावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सद्यस्थितीत पटसंख्या कमी झालेल्या काही शाळांमधून जे शिक्षक कार्यरत आहेत. ते कमी पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे एका इमारतीत सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळाची पटसंख्या १५० पेक्षा कमी असल्याने त्यांना मुख्याध्यापक पद मान्य होत नाही.
त्यामुळे या दोन्ही शाळा एकत्र केल्यास शाळेचा पट वाढुन मुख्याध्यापक पद मान्य होईल.
शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
शाळेत सकाळी सात वाजता विद्यार्थी उपस्थित राहण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
त्यामुळे शाळाचे विलीनीकरण केल्यास इमारतीचा पुर्णवेळ वापर करता येणार आहे.
तसेच अध्यापनाचे तास वाढविता येणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक