Pune Cyber Police | पिंपरी: सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन, ‘ही’ पीडीएफ फईल आली तर उघडू नका

Cyber Police

पिंपरी : Pimpri Chinchwad Cyber Police | ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Cheating Fraud Case) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Thieves) कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत आहे. सध्या नवीन फंडा आरोपींनी शोधला आहे. त्यामध्ये एक पीडीएफ फाईल पाठवली जात असून ही फाईल संबंधित नागिरकाने ओपन केली असता त्यांच्या बँक खाते रिकामे होत आहे. पीडीएफ फाईल ओपन केल्यानंतर बँक खात्यातून रक्कम दुसऱ्या अनोळखी खात्यावर ट्रान्स्फर होत आहे. (Pune Cyber ​​Police)

सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या नावाचा आणि लोगोचा वापर करत आहेत. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन नागरिकांना संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत. त्यासाठी नागरिकांना Union Bank Addhar Update61.apk या नावाची फाईल पाठवली जात आहे.

या फाईलच्या माध्यमातून नागरिकांच्या मोबाईलमध्ये Torzon virus पाठवून त्याद्वारे नागरिकांच्या वैयक्तीक माहितीची गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक आणि नुकसान केले जात आहे. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन आलेली कोणताही लिंक, वेबसाईट किंवा फाईलवर क्लिक करु नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून करण्यात आले आहे. (Pune Cyber ​​Police)

सांगवीत महिलेची फसवणूक

सांगवी : एका महिलेला तिच्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर एक पीडीएफ फाईल पाठवली.
महिलेने ती फाईल ओपन केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून 45 हजार रुपये अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले.
हा प्रकार 14 जुलै रोजी नवी सांगवी येथे घडला. महिलेने याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed