Pune Police News | खडक पोलिसांनी 25 मोबाईल केले नागरिकांना परत; नागरिकाकडून पोलिसांचे कौतुक

Khadak Police

पुणे : Khadak Police News | मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला (Mobile Theft) की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. मात्र, तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता खडक पोलिसांनी खोडून काढली आहे. शुक्रवारी (दि.19) चोरी, गहाळ झालेले 25 मोबाईल खडक पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे. हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. (Pune Police News)

पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक मधील नागरिकांचे 2023 ते 2024 या कालावधीत चोरीला गेलेले, गहाळ झालेल्या मोबाईलबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मोबाईलमध्ये महत्त्वाचा डाटा, डॉक्युमेंट असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. खडक पोलिसांकडून मोबाईलचा पुणे शहर तसेच इतर जिल्ह्यात तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेतला. खडक पोलिसांनी चोरीस गेलेले, गहाळ झालेले 4 लाख रुपये किमतीचे 25 मोबाइल फोन प्राप्त करुन ते पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल यांच्या हस्ते संबंधित फिर्यादीला परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार सागर कुडले यांनी केली. (Pune Police News)

नागरिकांनी त्यांचे मोबाईल फोन चोरी झाल्यास,
गहाळ झाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये अथवा पुणे शहर पोलीस पोर्टलवर जावून तक्रार नोंदवावी,
असे आवाहन खडक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed