Vasant More Threat Call | एक तारखे आधी मी मोरेचा खून करणार, वसंत मोरे यांना धमकीचा फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल (Video)
पुणे : Vasant More Threat Call | शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबद्दल वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
वसंत मोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मगील 15 दिवसांपूर्वी मी माझ्या नित्यक्रमाने दिवसभर माझ्या कामात व्यस्त होतो. मला माझ्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने फोन करुन शिव्या देण्यास सुरुवात केली. मी त्याला कारण विचारले असता त्याने काहीही न सांगता शिव्या देणे सुरु ठेवले. मग मी दुर्लक्ष करुन त्याचा फोन कट केला. तो परत फोन करुन शिव्या देऊ लागला.
मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मी त्याचा नंबर ब्लॉक केला. मग त्याने दुसऱ्या नंबरवरुन कॉल करण्यास सुरुवात केली. मग मी माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला फोन करुन सांगितले की, मी कामात आहे, कोणीतरी या क्रमांकावरुन फोन करुन मला शिव्या देत आहे. तु त्याला फोन करुन माहिती घे , त्याचा काय प्रॉब्लेम आहे. मग प्रतिकने त्याला फोन केल्यावर त्याने प्रतिकलाही शिवीगाळ केली.
तक्रारीत लिहिलं आहे की, अज्ञात व्यक्ती म्हणाला की, येत्या एक तारखेच्या आधी मी वसंत मोरेचा खून करणार असे बोलून संबंधित व्यक्ती शिव्या देऊ लागला. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना अशा गोष्टी घडत असतात असा विचार करुन मी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सद्यस्थितीत सुरु असलेल्या घटना लक्षात घेता ही गोष्ट गांभीर्याने घेणे मला महत्त्वाचे वाटले म्हणून मी या पत्राद्वारे विनंती करत आहे की, मला फोन करुन धमकी देणाऱ्या व्यक्तीचा आपण शोध घ्यावा.
साईनाथ बाबर यांच्यावर संशय
मोरे यांनी तक्रारीत पुढे म्हटले की,
या सर्व प्रकरणामागे व मला जीवे मारण्याची धमकी द्यायला लावण्यामागे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा मला दाट संशय आहे.
तरी मी आपणास विनंती करतो की, मला फोन करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला व
मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर त्वरित कारवाई करुन त्यांना अटक करावी,
अन्यथा रविवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी दहा वाजता भारती विद्यपीठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक