Ravet Pune Accident News | पिंपरी : कारची ट्रायल घेताना ब्रेक लॉक, कारची 8-10 दुचाकींना धडक (Video)

Ravet Pune Accident News

पिंपरी : Ravet Pune Accident News | दुरुस्त केलेल्या कारची ट्रायल घेत असताना तांत्रिक बिघाड होऊन कारचा ब्रेक लॉक झाला. त्यामुळे कारने आठ ते दहा दुचाकींना आणि एका चारचाकी गाडीला धडक दिली. यामध्ये दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी मस्के वस्ती, रावेत येथे घडली. (Ravet Pune Accident News)

https://www.instagram.com/p/C9m6OZ4pdJn

रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्के वस्ती येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी कार आली होती. कार दुरुस्त केल्यानंतर गॅरेज चालक कारची ट्रायल घेत होता. रावेत बीआरटीएस रस्त्यावर म्हस्के वस्ती जवळ कारची ट्रायल घेत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि ब्रेक लॉक झाला.

https://www.instagram.com/p/C9msKYpJsEC

ब्रेक लॉक झाल्याने कार कार घसरली गेली आणि कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 8 ते 10 दुचाकींना ठोकरले. यामध्ये दुचाकीसह कारचे नुकसान झाले. कारने दुसऱ्या एका चारचाकी गाडीला धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती रावेत पोलिसांनी (Ravet Police Station) दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed