Ramdara Wadki Pune Crime News | पुणे : बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर एक वर्षांनी गुन्हा दाखल, स्टेज कोसळूने दोघांचा झाला होता मृत्यू

पुणे : Ramdara Wadki Pune Crime News | छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील वडकी येथील रामदरा परिसरात बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) एक वर्षांनी बैलगाडा आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 4 जून 2023 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती. (Ramdara Wadki Pune Crime News)
यप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किशोर हणमंत पवार API Kishor Pawar (वय-41) यांनी शुक्रवारी (दि.19 जुलै 2024) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार बैलगाडा शर्य़त आयोजित करणारे संदिप बबन मोडक Sandeep Baban Modak (वय-41 रा. वडकी ता. हवेली) यांच्यावर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय-46 रा. निनाम पाडळी, जि. सातारा) आणि अंकुश साधु चोर (वय-65) यांचा मृत्यू झाला होता.
लोणी काळभोर परिसरातील रामदरा परिसरात 4 जून 2023 रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीसाठी स्टेज बांधला होता. 4 जून रोजी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. जोरदार वारे वाहत असल्याने बाळासाहेब कोळी आणि अंकुश चोर यांच्यासह इतर काही जण आडोशाला स्टेजजवळ थांबले. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज आडोशाला थांबलेल्या कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळला.
स्टेज कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कोळी यांचा उपचारापूर्वी तर चोर यांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. बैलगाडा शर्यतीचे आयोजक संदिप मोडक यांनी शर्यतीचे आयोजन
करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने लोखंडी रॅक व स्टेज कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने मोडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत