Sexual Assault On Female Dog In Pune | पिंपरी : धक्कादायक! श्वान मादीवर लैंगिक अत्याचार, परप्रांतीय तरुणावर FIR

kutta

पिंपरी : Sexual Assault On Female Dog In Pune | पिंपरी-चिंचवडमध्ये एका श्वान मादीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार 16 जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास वाकड (Wakad) परिसरातील एका निर्माणाधिन बांधकाम प्रकल्पावर घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. (Sexual Assault On Female Dog In Pune)

याप्रकरणी सुरक्षा रक्षक लवलेश रामप्रसाद तिवारी (वय 29, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिरंजीत निशिकांत बिस्वास (वय 30, रा. उत्तर दिनाजपुर, गोलपोखर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात एका निर्माणाधिन बांधकाम प्रकल्प सरु आहे. आरोपी चिरंजीत याने बांधकाम प्रकल्पावर आठ ते दहा महिने वयाच्या श्वान मादी पिल्लाला आणले. इमारतीच्या तळमजल्यावर नेले. तिचा छळ करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

You may have missed