Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या शिपायावर गुन्हा दाखल

rape-girl

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | एका अल्पवयीन गतीमंद मुलीला अश्लील व्हिडीओ (Porn Videos) दाखवून शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 16 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास शाळेच्या स्वच्छतागृहाच्या बाहेरील पॅसेजमध्ये घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) 50 वर्षीय शिपायावर पोक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 38 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नारायण कुमाजी ठुबल Narayan Kumaji Thubal (वय-50 रा. गणेशनगर, मुळ रा. बोपखेल ता. हवेली) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(डी),(के)(एम), 67, 75 सह मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अपंग व्यक्तीचा हक्क कायदा कलम 72(ब)(ड), नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गतीमंद असून निगडी परिसरातील एका शाळेत शिकते. मुलगी गतीमंद आणि अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवले. तिला मारण्याची धमकी देऊन अत्याचार केले. हा प्रकार आरोपीने 2022 पासून वेळोवेळी केला आहे. 16 जुलै रोजी पीडित मुलगी शाळेच्या बाथरुमजवळ असलेल्या पॅसेजमध्ये असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवला.

तसेच तिला मारण्याची धमकी देऊन तिला जवळ ओढून गैरवर्तन करुन तिच्या
स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच स्वच्छतागृहात नेऊन तिच्यासोबत
वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
फिर्य़ादी यांच्या तक्रारीवरुन आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून
आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

You may have missed