Ajit Pawar | “मी अजित आशा अनंतराव पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; शहरात चर्चा
पुणे : Ajit Pawar | अजित पवार मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी इच्छा आहे. अनेक कार्यक्रमांमधून ही इच्छा कार्यकर्त्यांनी जाहीर बोलून दाखवली आहे. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून केला जातो.
अनेकदा बॅनर व होर्डिंगवरदेखील तसा उल्लेख आढळतो. अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केक आणला होता. या केकवरील मजकुरामुळं पुन्हा एकदा दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Ajit Pawar Birthday)
अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी सांगवीमध्ये अतुल शितोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचा मुलगा आदिराज शितोळे आणि त्याच्या साथीदारांनी केक आणला होता. अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस असल्याने त्यांनी दादांना केक कापण्याचा आग्रह केला.
एरवी अजित पवार केक कापत नाहीत. पण त्यांनी केक पहिला
आणि केकवर लिहलेला मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… हा मजकूर वाचला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो कापला, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
या अनोख्या शुभेच्छा संदेशामुळे हा केक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा