Devendra Fadnavis – BJP Executive Meeting In Pune | ‘4 वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते, मग…’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पुणे : Devendra Fadnavis – BJP Executive Meeting In Pune | पुण्यात भाजपचे महाअधिवेशन सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) रणनीती ठरवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha-OBC Reservation) मोठा फटका बसला. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दोन्ही समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेले आहेत.
दरम्यान आजच्या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, ”अण्णासाहेब पाटलांनी जर १९८२ साली स्वत:ला गोळी झाडून घेतली होती. तुम्ही चार वेळा तिकडे रेकॉर्डवर सांगितले. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललेय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि चार वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम सुरु आहे. दोन समाजामध्ये पेट्रोल टाकण्याच काम काही नेते करतायत”, असा आरोप फडणवीसांनी शरद पवारांवर केला. (Devendra Fadnavis – BJP Executive Meeting In Pune)
ते पुढे म्हणाले, ”हो आम्ही आरक्षण दिलं. आणि आरक्षण देऊत ते हायकोर्टातही टिकवलं.
आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात तीन वेळा सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. सुप्रीम कोर्टातही आरक्षण आम्ही टिकवलं.
पण दुदैवाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Govt) आलं आणि आरक्षण गेलं.
त्याला टिकवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही”, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांवर केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा