Ajit Pawar On Sharad Pawar | ‘शरद पवार हे माझं दैवत, मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही’- अजित पवार
पुणे : Ajit Pawar On Sharad Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक (District Planning Committee Pune) पार पडली. अडीच तास चाललेल्या या बैठकीत शरद पवार यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) नाराज झाल्या आहेत. डीपीडीसीच्या बैठकीत (DPDC Meeting) जे काही घडले ते महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीत पहिल्यांदाच घडले असून हे खेदजनक आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पुण्यात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीत निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून राजकारण पेटल्याचं पाहायला मिळालं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नॅरेटिव्ह सेट करत आहेत. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढत प्रत्युत्तर दिले आहे. उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही, अरे मी कसा बोलू देणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी पिंपरी- चिंचवडच्या सभेमध्ये अजित पवारांवर टीका केली होती. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला बोलू दिलं नसल्याचं म्हणत निधी वाटपाबाबत भेदभाव केल्याचा देखील आरोप त्यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. करणार पण नाही.
सुसंस्कृत म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. इथे सर्वांचा आदर केला जातो.
त्यामुळे ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलू दिलं जात नाही,
निधी दिला जात नाही यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा