Amit Shah On Maratha Reservation | अमित शहांचे आरक्षणावर वक्तव्य; आश्वासन देत म्हणाले – ‘राज्यात भाजपचं सरकार…’

Amit Shah

पुणे : Amit Shah On Maratha Reservation | पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi) येथे आज रविवारी (२१ जुलै) पार पडत असलेल्या प्रदेश कार्यकारणीच्या अधिवेशनात (BJP Executive Meeting In Pune) बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला.

यावरूनच बोलताना अमित शहा म्हणाले, ” पवार साहेबांना आज सांगतो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं. जेव्हा सरकार जातं तेव्हा मराठा रिझर्व्हेशन गायब होतं. २०१४ मध्ये मराठा आरक्षण लागू केलं तेव्हा भाजपचं सरकार होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मधल्या काळात शरद पवारांचं सरकार होतं, मराठा रिझर्व्हेशन गायब झालं. आता पुन्हा आमचं सरकार आलं आम्ही मराठा आरक्षण दिलं आहे. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर भाजपचंच सरकार पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केवळ भाजपने केलं आहे, असं अमित शाह म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ” २०२४ मध्ये पुन्हा कमळाच्या युतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणं आवश्यक आहे. साठ वर्षांमध्ये पहिल्यांदा देशामध्ये एका व्यक्तीच्या हातात सरकार देण्याचं काम देशातील जनतेने केलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडसं कन्फ्युजन होताना दिसून येत आहे, परंतु कसलाही गैरसमज करुन घेण्याची गरज नाही.

त्यासाठी एक उदाहरण देतो, दोन मुलं आहेत. एकाच वर्गात शिकत होते.
एक ८० टक्के घेऊन वर्गात नंबर एकवर येत होता तर दुसऱ्या वेळेस त्याने ९० टक्के घेण्याचा संकल्प केला.
जो दुसरा विद्यार्थी होता तो चार वर्षात त्याच वर्गात होता. त्याला २० मार्क पडायचे.
यावेळी त्याने २५ मार्काची अपेक्षा ठेवली होती.
निकाल आला तेव्हा ८० टक्केवाल्या विद्यार्थ्याला ७५ मार्क मिळाले आणि २० वाल्याला २५ मार्क मिळाले.
असाच प्रकार आपल्या बाबतीत घडला आहे”, असे अमित शहा म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed